
सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना लॉरेंस बिश्नोई (Lawrence Bishnoi) यांच्या नावाने जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी सगळीकडे खळबळ उडाली आहे. धमकी देणारा व्यक्ती हा पुण्यातील असल्याची माहिती समोर आली आहे.
मोठी बातमी! LPG गॅस सिलेंडर झाला स्वस्त
या प्रकरणामध्ये पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेतलं असल्याची माहिती समोर आली आहे. पंजाबमधील खतरनाक गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने ही धमकी देण्यात आली आहे. माहितीनुसार, राऊतांना काल रात्री 9 वाजता त्यांच्या मोबाईलवर एक टेक्स्ट मेसेज आला. या मेसेजमध्ये त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.
इंदूरमधील त्या घटनेबाबत समोर आली मोठी अपडेट; मृतांचा आकडा वाढला
एका वृत्तवाहिनीशी बोलताना राऊतांनी याबाबत माहिती दिली आहे. याबाबत बोलताना राऊत म्हणाले, मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) या प्रकरणी काही लोकांना ताब्यात घेतलं आहे. मात्र हे नेमके किती लोक आहेत, याची माहिती नाही, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. आता संजय राऊत यांच्या सुरक्षिततेमध्ये वाढ करण्यात आली आहे.
पुणे पोटनिवडणुकीबाबत अजित पवार यांनी केलं मोठं विधान; म्हणाले, “महाविकास आघाडीला लाज…”