
अपघाताच्या घटना काही थांबायचं नाव घेत नाहीत. दररोज कुठे ना कुठे अपघात होत आहेत. सध्या देखील एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. देवदर्शन घेऊन घरी निघताना एका कुटुंबावर काळानं घात केला आणि भीषण अपघात झाला अन् होत्याचं नव्हतं झालं. (Accident News)
बारामतीत सुप्रिया सुळे-पार्थ पवार आमने सामने? पवार कुटुंबातील व्यक्तीने दिले ‘हे’ उत्तर
रामटेकगड येथून देवदर्शन आणि पर्यटन करून भंडाराकडे निघालेल्या कारचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ७ जण जखमी झाले आहेत.
पाण्यात बुडालेल्या ‘त्या’ तरुणांना शोधण्यासाठी सोडले कॅमेरे, रेस्क्यू टीमला एक मृतदेह शोधण्यात यश
भरधाव कारने उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडक दिली. आणि हा भयानक अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच तेथील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातामध्ये जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
दोन उपमुख्यमंत्र्यानंतर आता दोन उपसरपंच? पठ्ठयाने केली एकनाथ शिंदेंकडे अजब मागणी
हा अपघात इतका भीषण होता की समोरच्या सीटवर बसलेला चालक आणि महिला जखमी अवस्थेत कारमध्ये अडकून पडली होती. त्यानंतर त्यांना उपचारासाठी ताबडतोब रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.