
Bus Accident । बुलढाणा : देशात दररोज होणारे अपघात (Accident) पाहता सरकारने देशात वाहतुकीचे नियम (Traffic rules) कडक केले आहेत. तरीही अपघाताचे सत्र सुरूच आहे. या अपघातात अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहे. तर अनेकांना कायमचे अपंगत्व येत आहे. अपघातांमुळे कित्येक संसार उध्वस्त होत आहेत. सध्या असाच एक अपघात दोन खासगी बसदरम्यान (Bus Accident) झाला आहे. (Latest Marathi News)
Sharad Pawar । शरद पवारांचं ठरलं! म्हणाले, आता कोणत्याही परिस्थितीत …
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक खासगी बस अमरनाथ येथून हिंगोलीच्या दिशेने येत होती. या बसमध्ये 35 ते 40 प्रवासी होते. तर नागपूर वरून नाशिकला जाणाऱ्या दुसऱ्या खासगी बसमध्ये 25 ते 30 प्रवासी होते. या दोन्ही बसची मलकापूर शहरातून जाणाऱ्या हायवेवर समोरासमोर धडक झाली. दरम्यान, हा अपघात इतका भीषण होता की यात दोन्ही बसचा अक्षरशः चुरा झाला. (Buldhana Bus Accident)
Manipur Violence । “आता आमच्यावर बलात्कार होऊ देणार नाही”; मणिपूरच्या महिला हातात मशाल घेऊन आक्रमक
या दुर्दैवी दुर्घटनेत सहा जणांचा जागीच मृत्यू तर 20 ते 25 प्रवासी जखमी झाले आहेत. यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघाताची माहिती मिळताच तातडीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले. (Bus Accident News)
भारीच की राव! टोमॅटो नाही तर आलं लावून शेतकरी बनला कोट्यवधी रुपयांचा मालक
हे ही पहा