भीषण अपघात! ट्रकने चार वाहनांना चिरडले, एकाच जागीच मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी

Terrible accident! The truck crushed four vehicles, killing one on the spot and seriously injuring three

अपघाताची पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईमध्ये एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील चुनाभट्टी न्यूज येथे भरधाव वेगात आलेल्या सिमेंट मिक्सर ट्रकने चार वाहनांना धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. (Accident at Chunabhatti News in Mumbai)

असं काय घडलं की पुण्यात टोमॅटोवरुन भाजी विक्रेता आणि ग्राहकामध्ये फ्री स्टाईल हाणामारी

हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातामध्ये एक जणाचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, ईस्टर्न एक्सप्रेस हायवेजवळ हा भीषण अपघात झाला. तेथील उपस्थितांनी दिलेल्या माहितीनुसार, मिक्सर ट्रकने दोन अॅक्टिव्हा, एक मोटारसायकल आणि पीयूसी व्हॅनला धडक दिली. यामध्ये एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे.

“सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आगामी निवडणूका लढवण्याची माझी मानसिकता नाही”, राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराकडून खदखद व्यक्त

या घटनेची माहिती मिळताच तेथील स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेला आहे.

Sharad Pawar । ‘शरद पवार सैतान, या सैतानाला पाप फेडावे लागत आहे’, ‘या’ बड्या नेत्याची जहरी टीका

Spread the love