
समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) जसे सतत अपघात होतात. तसेच पुण्यातील (Pune) नवले पुलाजवळ देखील अपघात होत असतात. या ठिकाणी अपघात होण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. सध्या देखील या ठिकाणी एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई बंगळुरू महामार्गावर पुण्यातील नऱ्हे परिसरात नवले पुलाजवळील भूमकर पुलावर कंटेनर पलटी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (Latet Marathi News)
ही घटना सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली असून हा कंटेनर साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने कोळसा वाहून नेत असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत अधिकची माहिती अशी की, भूमकर पुलाजवळ कंटेनर लोखंडी दुभाजक तोडून विरुद्ध दिशेला जाऊन उलटला. याबाबत माहिती मिळताच तेथील स्थानिकांनी गर्दी केली.
दोन उपमुख्यमंत्र्यानंतर आता दोन उपसरपंच? पठ्ठयाने केली एकनाथ शिंदेंकडे अजब मागणी
या अपघातामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र कंटेनरचा चालक जखमी झाला असून त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक व्यवस्था सुरळीत केली.