Tamil Nadu Rain । तामिळनाडूत पावसाचा धुमाकूळ; शाळा-कॉलेज बंद, गाड्याही रद्द

Tamilnadu Rain News

Tamil Nadu Rain । तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तामिळनाडूतील चार जिल्हे अतिवृष्टी आणि पूरसदृश परिस्थितीमुळे सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. हे चार जिल्हे म्हणजे तिरुनेलवेली, तुतीकोरीन, तेनकासी आणि कन्याकुमारी. तुतीकोरीन जिल्ह्यातील तिरुचेंदूर येथे पहाटे दीड वाजेपर्यंत अवघ्या 15 तासांत 60 सेंटीमीटर पाऊस झाला. तिरुनेलवेली जिल्ह्यातील पलायमकोट्टई येथे २६ सेमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, कन्याकुमारीत 17.3 सेमी पाऊस झाला आहे.

Big accident in Sinhagad Ghat । सिंहगड घाटात मोठी दुर्घटना! 12 पर्यटकांना घेऊन जाणारी जीप उलटली

मुसळधार पावसामुळे बाधित जिल्ह्यांमध्ये सोमवारी (18 डिसेंबर) सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या काळात शाळा, महाविद्यालये, बँका, खाजगी आस्थापना आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या देखील बंद राहतील. केवळ मुसळधार पाऊसच नाही तर धरणातून सोडण्यात आलेले पाणीही लोकांसाठी अडचणीचे ठरले आहे. पापनासम, पेरुंजानी आणि पेचुपराई धरणातून पाणी सोडण्यात आल्याने तिरुनेलवेली, थुथुकुडी आणि कन्याकुमारी जिल्ह्यातील अनेक भाग गुडघाभर पाण्यात बुडाले आहेत.

Ahmednagar Kalyan Accident । भाजी विकण्यासाठी गेलेल्या शेतकरी कुटुंबावर काळाचा घाला, पीकअपची रिक्षाला जोरात धडक, ८ जणांचा मृत्यू

आजही मुसळधार पाऊस पडणार

पावसामुळे थामरापारणी नदीला पूर आला आहे. त्यामुळेच धरणांतील पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) आजही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोमोरिन परिसरात चक्रीवादळ निर्माण झाल्याने परिस्थिती आणखी गंभीर होत आहे. काही दिवसांपूर्वीच मिचॉन्ग चक्रीवादळ तामिळनाडूला धडकले होते, त्यामुळे त्याचे मोठे नुकसान झाले होते.

Dawood Ibrahim । मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग? खासगी रुग्णालयात भरती असल्याची माहिती

Spread the love