
‘द केरला स्टोरी’ या चित्रपटामुळे पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या जगाच्या पाठीवर कुठल्याच देशात मुली सुरक्षित नाहीत. रोज कुठे ना कुठेतरी मुलीचा विनयभंग झाल्याच्या किंवा बलात्कार झाल्याच्या घटना घडत असतात. दरम्यान मलेशिया मध्ये स्कुबा डायव्हिंग ( Scuba diving) साठी गेलेली मुलगी विनयभंगाची बळी ठरली आहे. स्कुबा डायव्हिंगसाठी मदत करणाऱ्या ट्रेनरनेच तिच्या सोबत गैरकृत्य केले आहे.
IPL | बहुचर्चित आरसीबी विरुद्धच्या सामन्यातून रोहित शर्माची कल्टी! मुंबई इंडियन्सचे चाहते चिंतेत
मलेशियातील सबाह (Sabah) राज्यामध्ये २४ वर्षीय चिनी मुलीला समुद्रात स्कुबा डायव्हिंग करताना विनयभंगाचा प्रकाराला सामोरे जावे लागले. स्कुबा डायव्हिंगसाठी सोबत आलेल्या ट्रेनरने पाण्याच्या आत या मुलीला जबरदस्ती किस (Kiss) करण्याचा प्रयत्न केला. याबाबत पीडित मुलीने तक्रार केली असता, आरोपी ट्रेनरला अटक करण्यात आली आहे.
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात घडला धक्कादायक प्रकार; वाचून तुम्हालाही बसेल धक्का…
पीडित मुलीच्या सांगण्यानुसार ट्रेनरने फक्त पाण्याच्या आतच नाही तर पाण्यातून बाहेर आल्यानंतर देखील तिच्यासोबत गैरवर्तन केले होते. तो ट्रेनर सतत तिचा पाठलाग करत होता. तसेच तिच्या मोबाईलवर मेसेज करत होता. यामुळे घाबरून पीडित मुलीने चीनला परतण्यापूर्वी या ट्रेनर विरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी सबाह राज्याचे पर्यटन मंत्री क्रिस्टीन ल्यू यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच पर्यटन स्थळी असले कृत्य खपवून घेतले जाणार नसल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले.
एकदम हटके अदांमुळे एका रात्रीत फेमस झालेली मुलगी आठवतेय का? आता समुद्रकिनारी करतेय…