
Supriya Sule । बारामती : राज्यात लवकरच विधानसभा (Vidhansabha election) आणि लोकसभेच्या निवडणुका (Loksabha election) पार पडणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांची मोर्चेबांधणी सुरु आहे. परंतु, काही दिग्ग्ज पदाधिकारी पक्षांतर करत आहेत. यंदाची निवडणूक (Election 2024) अटीतटीची असेल. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन गट पडले आहेत. सर्वसामान्य जनता कोणत्या पक्षाला कोणत्या गटाला मत देणार? हे पाहणे महत्त्वाचे असेल. (Latest Marathi News)
Rakhi Sawant । अभिनेत्री राखी सावंतला पुन्हा लग्न करायचंय, लग्नाबाबत केले मोठे वक्तव्य!
खासदार सुप्रिया सुळेंनी पुढील 10 महिन्यांसाठी घेतला मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी हा पक्ष (NCP) तळागाळातला पक्ष असून मी नवऱ्याला आणि मुलांना सांगितला आहे ऑक्टोबरपर्यंत आता सांभाळून घ्या. एप्रिलमध्ये लोकसभा आणि ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका असल्यामुळे दहा महिने मी मुंबईकडे येत नाही. भेटायचं असेल तर पुणे, इंदापूर नाहीतर बारामतीला (Baramati) यावं लागेल, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
Politics News MadhyaPradesh । राजकारणातून मोठी बातमी! काँग्रेसला सर्वात मोठा झटका
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बंड झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपला स्वतंत्र गट तयार केला. त्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना कोडींत पकडण्याचे ठरवले आहे. अशातच त्यांनी पुणे जिल्ह्यातील बारामती आणि शिरुर लोकसभा मतदार संघात शरद पवार गटातील उमेदवाराचा पराभव करण्यासाठी कंबर कसली आहे. अजित पवारांच्या या भूमिकेचा सुप्रिया सुळे यांनी धसका घेतल्याचे बोलले जात आहे.
Instagram । अरे वा! ‘या’ नवीन फीचरमुळे इन्स्टाग्रामवर तुमचेही फॉलोअर्स झपाट्याने वाढणार