सुप्रिया सुळेंनी चक्क बैलगाडीतून सफर करत केली शेताची पाहणी!

Supriya Sule inspected the field by traveling in a bullock cart!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पुणे दौऱ्यात चक्क शेतात जाऊन पिकांची पाहणी केली आहे. यावेळी बैलगाडीवरून सफर करून त्यांनी शेती पाहिली. पुण्यातील आयटी हब असणाऱ्या हिंजवडी (Hinjawadi) येथे स्ट्रॉबेरीच्या शेतीचा ( Strawberry Farming) प्रयोग पाहण्यासाठी त्या गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी स्ट्रॉबेरी सुद्धा चाखली.

राखी सावंतच्या लग्नाबद्दल पहिल्या पतीने दिली प्रतिक्रिया; म्हणाला, “…तर कधी मुस्लीम बनते”

दरम्यान आजूबाजूच्या शेतातील शेतकऱ्यांशी देखील त्यांनी संवाद साधला. विशेषतः प्रयोगशील शेतकऱ्यांचे त्यांनी कौतुक केले. तसेच या शेतकऱ्यांकडून स्ट्रॉबेरी शेतीबद्दल माहिती देखील घेतली. यावेळी हिंजवडी मधील गावकऱ्यांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

दौंडच्या घटनेबाबत मोठी अपडेट; पोलीस तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर

शेतकऱ्यांनी आर्थिक फायदा मिळवण्यासाठी व शेतीच्या विकासासाठी शेतात नवनवीन प्रयोग करायला हवेत. असे देखील सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या आहेत. थेट शेतात जाऊन स्ट्रॉबेरीच्या शेतीची माहिती घेणाऱ्या व बैलगाडी सफरीचा आनंद घेणाऱ्या सुप्रिया सुळेंचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

पुण्याबरोबर आता साताऱ्यामध्ये कोयता गॅंगची दहशद

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *