
Sujay Vikhe Patil । भाजपचे खासदार आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांचा मुलगा सुजय विखे पाटील हे त्यांच्या वक्तव्यामुळे कायम चर्चेत असतात. सध्या देखील त्यांनी सभेत एक वक्तव्य केले आहे. त्यामुळे ते चांगले चर्चेत आले आहेत. एका सभेत बोलताना सुजय विखे पाटील म्हणाले, ‘रात्री कोण कुणाच्या घरी जातो याचे माझ्याकडे व्हिडिओ आहेत’ असं जाहीर वक्तव्य सुजय विखे पाटील यांनी केले आहे. (Latest Marathi News)
त्याचबरोबर पुढे बोलताना सुजय विखे पाटील म्हणाले, वेळ आल्यावर हे काय करतात हे सगळ्यांना पुराव्यासह दाखवेन. असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे. यानंतर विखेंचा रोख नेमका कुणाकडे याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. कुणाचं खातं कोणत्या बँकेत आहे? कोण कुठे जातं? कोण रात्री बाहेर पडतं? कुणाच्या घरी जातं? याची मला संपूर्ण माहिती आहे. माझ्याकडे याचे व्हिडिओ शूटिंग देखील आहेत असे देखील सुजय विखे पाटील म्हणाले आहेत.
त्याचबरोबर यावेळी बोलताना सुजय विखे पाटील यांनी एक इशारा देखील दिला आहे. ते म्हणाले, मी सहा महिन्यापूर्वीच यांच्या मागे लोक ठेवली आहेत हे काय करतात, काय नाही हे सगळ्या पुराव्यासह दाखवेन फक्त त्यांना एकदा उभे राहू द्या. असा इशारा त्यांनी दिला आहे. त्याचबरोबर माझा फार छोटा प्रश्न आहे. हे साडेचार वर्ष कुठे होते? असा प्रश्न देखील त्यांनी विचारला आहे. त्यामुळे आता विखेंचा रोख नेमका कोणाकडे आहे. याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.