
Weather Update । मुंबई : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसाने (Heavy Rain in Maharashtra) उघडीप दिली आहे. त्यामुळे पावसाच्या परतीकडे शेतकऱ्यांसह सर्वांचे लक्ष लागले आहे. काही शेतकऱ्यांनी जेमेतेम पावसाच्या जोरावर पुरेसा केल्या आहेत. जर येत्या काळात पाऊस (Rain in Maharashtra) लवकर पडला नाही तर त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट येऊ शकते. अशातच आता भारतीय हवामान खात्याने (IMD) एक आनंदाची बातमी दिली आहे. (Latest Marathi News)
फडणवीसांविरोधात गुन्हा दाखल करणाऱ्या ‘त्या’ वकिलासह ६ जणांवर कारवाई, जाणून घ्या नेमकं प्रकरण
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, या आठवड्यात विजांच्या गडगटांसह विदर्भ आणि कोकणातील बहुतांश भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार (IMD Alert) पडू शकतो. तर पालघर, रायगड, नवी मुंबईमध्ये ढगाळ वातावरण असेल. १८ ते २४ ऑगस्ट दरम्यान पाऊस पुन्हा जोर धरू शकतो. राज्यात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाने पाठ फिरवली आहे.
Bigg Boss Ott Season 2 Winner | एल्विश यादव ठरला बिग बॉसच्या दुसऱ्या सीझनचा विजेता
दरम्यान, मागील महिन्यात झालेल्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ४ धरणांमध्ये मुबलक प्रमाणात पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे पुणेकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. तर मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात समाधानकारक पाऊस पडत आहे. त्यामुळे पुढील दहा महिन्यांसाठी मुंबईकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
Krishi Seva Kendra । घरबसल्या मिळवा कृषी सेवा केंद्रासाठी परवाना, फॉलो करा ‘ही’ प्रोसेस
राज्यात यंदा पावसाने उशिरा आगमन केले होते. परंतु जून महिन्याच्या शेवटी पाऊस सुरू झाल्यानंतर जुलै महिन्यात पावसाच्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांना दिलासा मिळाला होता. अशातच आता के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यामध्ये १८ ऑगस्टपासून पावसाची शक्यता आहे.
Raj Thackeray । भाजपने युतीसाठी ऑफर दिली आहे पण… राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य