
मुंबई : T20 विश्वचषक 2021 पासून, भारतीय संघाला माजी कर्णधार विराट कोहली आणि सध्याचा कर्णधार रोहित शर्मा यांच्यासह सर्व फॉरमॅटमध्ये एकूण 8 कर्णधार मिळाले आहेत. बीसीसीआयच्या निवड समितीने या वर्षाच्या सुरुवातीला सांगितले होते की ते भविष्यात रोहित शर्मानंतर काही खेळाडूंना कर्णधारपदासाठी तयार करत आहेत. कर्णधारपदात सातत्याने बदल झाल्यानंतर अनेक दिग्गज आणि क्रीडा तज्ज्ञांनी त्याच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. पण सौरव गांगुली यांनी (Sourav Ganguly) याला सडेतोड उत्तर दिले.
जानेवारीमध्ये कोहलीने कसोटी फॉर्मेटमधून पायउतार झाल्यानंतर लगेचच रोहितला सर्व फॉरमॅटमध्ये भारताचा पूर्णवेळ कर्णधार बनवण्यात आले. बीसीसीआयने एका निवेदनात नमूद केले होते की केएल राहुल, ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह ही नावे भविष्यातील नेतृत्वाच्या भूमिकेसाठी संघ व्यवस्थापनाला तयार करण्याचे लक्ष्य ठेवणार आहेत.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये सौरव गांगुली म्हणाला , “अनेक आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सहभाग असल्याने खेळाडूंना विश्रांती देणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे भारताला अधिकाधिक खेळाडूंना संधी देण्यास मदत होईल”. पुढे तो म्हणाला, “रोहित शर्मा कर्णधार आहे. आणि तो खूप खेळतो त्यामुळे दुखापती होणे सहाजिकच आहे म्हणूनच त्याला दुखापती-ब्रेक आवश्यक आहे. यामुळे अनेक नवे खेळाडू पुढे आले आहेत”.