
ज्या वेगाने एखादा माणूस मोठा होतो, त्या वेगाने त्याच्या आजूबाजूची लोकांची वलये मोठी होत जातात. सेलिब्रिटींच्या बाबतीत तेच होत! त्यांच्या आजूबाजूला कायम चाहत्यांचा गराडा असतो. बऱ्याचदा यामुळे सेलिब्रिटींना त्रास सुद्धा सहन करावा लागतो. नुकत्याच चेंबूर येथे झालेल्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक सोनू निगम (Sonu Nigam) याच्या बाबतीत एक घटना घडली आहे.
ऐश्वर्या रायने चक्क विमानाच्या टॉयलेट मध्ये पिले सिगारेट; जाब विचारताच शाहरुख खानचे नाव केले पुढे
सोमवारी ( ता.20) चेंबूर (Chembur) मधील एका संगीत कार्यक्रमासाठी गायक सोनू निगम उपस्थित होता. कार्यक्रम संपल्यानंतर व्यासपीठावरून खाली उतरताना सोनू निगम आणि त्याच्या काही सहकाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे. यामध्ये सोनू निगम व त्याच्या एका सहकाऱ्याला किरकोळ दुखापत झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मोठी बातमी! अदिलने कोर्टातच दिली राखीला धमकी; म्हणाला, “मी बाहेर आल्यावर…”
या घटनेनंतर सोनू निगमने तात्काळ चेंबूर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. सोनू निगमला धक्काबुक्की करणाऱ्या आरोपीचे नाव स्वप्नील फेटरपेकर आहे. अशी माहिती पोलीस उपायुक्त हेमराजसिंह राजपूत यांनी दिली.
#Breaking
— Sameet Thakkar (@thakkar_sameet) February 20, 2023
Singer Sonu Nigam who raised his voice about Azan Loudspeakers attacked by Janab Uddhav Thackeray MLA Prakash Phaterpekar and his goons in music event at Chembur. Sonu has been taken to the hospital nearby. pic.twitter.com/32eIPQtdyM
या घटनेसंदर्भात बोलताना सोनू निगम म्हणाला की, कार्यक्रमानंतर माझ्या सहकाऱ्यांबरोबर व्यासपीठावरून खाली येत असताना एका व्यक्तीने मला धक्काबुक्की केली. यावेळी हरी आणि रब्बानी यांनी मला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मी आणि रब्बानी खाली पडलो. त्याठिकाणी लोखंडी रॉड होते. यामध्ये कदाचित आमची जीवही गेला असता. मात्र, सुदैवाने आम्ही वाचलो.