Site icon e लोकहित | Marathi News

Sonia Gandhi । बिग ब्रेकिंग! सोनिया गांधी यांची तब्बेत अचानक बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात दाखल

Sonia Gandhi's health suddenly deteriorated, admitted to hospital for treatment

Sonia Gandhi । दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची आज अचानक प्रकृती बिघडली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना ताप आल्यामुळे उपचारासाठी दिल्लीमधील सर गंगाराम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Eknath Shinde । आताची सर्वात मोठी बातमी! मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या 5 सर्वात मोठ्या घोषणा

मागच्या दोन महिन्यापूर्वी देखील सोनिया गांधी यांची तब्येत खालावली होती. यावेळी देखील त्यांना दिल्लीमधील सर गंगाराम या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. सध्या रूग्णालयाबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवला आहे. (Sonia Gandhi Health Update)

Pune Bharti 2023 । नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! पुण्यात ‘या’ ठिकाणी सुरु आहे बंपर भरती

सध्या देशात लोकसभा निवडणुका होण्याची चिन्ह दिसत आहे. त्यामुळे देशांमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यामुळे मागच्या काही दिवसापासून सोनिया गांधी या राजकीय बैठकांना उपस्थित राहत आहेत. काही दिवसापूर्वी मुंबईत 28 पक्षांच्या बैठकीला देखील त्यांनी हजेरी लावली होती. त्याचबरोबर त्याच्या अगोदर विरोधकांच्या झालेल्या बैठकीमध्ये देखील सोनिया गांधी यांचे हजेरी लावली होती. सध्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी राजकारणात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Agriculture news । पावसाने पाठ फिरवल्याने नर्सरी चालकांचे लाखोंचे नुकसान, रोपांचा खर्चही निघेना

Spread the love
Exit mobile version