Site icon e लोकहित | Marathi News

Shrigonda News । श्रीगोंदा येथे समता परिषदेची तालुका आढावा बैठक पार पडली; नवे पदाधिकारी जाहीर

Shrigonda News

Shrigonda News । श्रीगोंदा – अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची श्रीगोंदा तालुकास्तरीय आढावा बैठक नुकतीच कुकडी गेस्ट हाऊस, श्रीगोंदा येथे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मा. अण्णासाहेब शेलार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत तालुकास्तरावरील संघटनबांधणी, आगामी निवडणुकांची रणनीती आणि नवे नेतृत्व याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

या बैठकीत समता परिषदेच्या श्रीगोंदा तालुकाध्यक्षपदी श्री. शिवाजी राऊत यांची, तर कार्याध्यक्षपदी श्री. साहेबराव रासकर यांची एकमताने शिफारस करण्यात आली. जिल्हा सरचिटणीसपदी श्री. संजय डाके यांची निवड झाली.

या प्रसंगी समता परिषदेचे प्रदेश प्रचारक डॉ. नागेश गवळी, प्रदेश प्रवक्ते मुकुंद सोनटक्के, जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे, अहिल्यानगरचे आबा भुजबळ, सुरेश सुपेकर, रामदास बनकर, गोरख आळेकर, वामनराव भदे, संकेत खामकर, विजय शेंडे, संतोष रायकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत बोलताना अण्णासाहेब शेलार यांनी आगामी नगरपालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. डॉ. गवळी यांनी राज्यभरात सुरू असलेल्या संघटनात्मक कार्याचा आढावा घेतला व शाखाविस्तारावर भर देण्याचे आवाहन केले.

प्रचारक मुकुंद सोनटक्के यांनी “गाव तेथे शाखा, घर तेथे सैनिक” ही भूमिका मांडत ओबीसी व वंचित घटकांसाठी संघटन मजबूतीवर भर दिला. जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे यांनी तालुक्यातील प्रत्येक गावात शाखा स्थापन करून कार्यकर्त्यांची मजबूत फळी तयार करण्याचा संकल्प व्यक्त केला.

शेवटी, नूतन तालुकाध्यक्ष संतोष रायकर यांनी सर्व मान्यवरांचे व कार्यकर्त्यांचे आभार मानले. संपूर्ण बैठकीत उत्साही वातावरण होते आणि समता परिषदेचे विचार तळागाळात नेण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करण्यात आला.

Spread the love
Exit mobile version