
Shrigonda News। आज दिनांक दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखली ता.- श्रीगोंदा जि.- अहिल्यानगर या शाळेत माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता. शासन निर्णयाप्रमाणे प्रत्येक शाळेत माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्यात यावा हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश. 1906 साली स्थापन झालेली जीवन शिक्षण मंडळ म्हणजेच आजची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखली या शाळेत माजी विद्यार्थी म्हणून अनेक पालकांनी उपस्थिती दर्शवली. आज माजी विद्यार्थी खऱ्या अर्थाने आनंदित होते की बराच कालावधीनंतर बालपणीचे दिवस आपण कसे जगलो आपले बालमित्र पुन्हा एकदा शाळेच्या मैदानावर एकत्र येण्याचा हा सोनेरी संगम. ‘लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा’ संत तुकाराम महाराजांच्या ओळी खूप काही सांगून जातात. बालपण म्हणजे निरागसता, खेळ आणि आठवणीचा खजिना. विविध खेळ अगदी कोयापासून, सूर पारंब्या, पोहणे, कुस्ती, क्रिकेट, कबड्डी, सागरगोटे अशा अनेक खेळांचा अष्टपैलू संगम.
आजच्या कार्यक्रमांमध्ये माजी विद्यार्थ्यांमधून श्री राजेंद्र पाटील झेंडे यांची माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्षपदी, श्री संजय पाटील लंके यांची उपाध्यक्षपदी, श्री गोरख पाटील लंके यांची कोषाध्यक्षपदी, तसेच अभय कार्ले पा., विजयसिंह झेंडे पा., केशव झेंडे, दत्तात्रय झेंडे महाराज, सुजय झेंडे पा. बाळासाहेब कचरू लंके पाटील, छाया टाकवणे /कार्ले यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष स्थान श्री अशोक कार्ले साहेब यांनी भूषवले. तसेच गावचे विद्यमान सरपंच कुलदीप भैय्या कदम पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले व शाळेच्या भरीव विकासासाठी सदैव मदत करण्याचे सांगितले. शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री अभय कार्ले पा. यांनी अत्यंत मोजक्या या शब्दात शाळेच्या विकासात्मक बाबीवर चर्चा केली. केशवराव झेंडे पाटील, श्री राजेंद्र झेंडे पा., श्री संजय लंके पा., दत्तात्रय महाराज झेंडे, बाळासाहेब लंके (पोलीस पाटील) यांनी उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांच्या समोर आपले मनोगत व्यक्त केले.
माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री राजेंद्र पा. झेंडे यांनी शाळेत उर्वरित कंपाउंड साठी तार जाळी दिली. तसेच शाळेच्या आवश्यक गरजा पूर्ण होण्यासाठी आम्ही सदैव आपल्या पाठीशी राहू अशी साद सर्वांनी दिली. श्रीम. छाया टाकवणे/कार्ले मॅडम यांनी ग्रंथालय साठी आवश्यक साहित्य व पुस्तके देण्याचे आश्वासन केले.
कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री विजयसिंह पाटील, श्री अभय कार्ले, श्री सुजय झेंडे पा., श्री. केशव झेंडे पा.,श्री. राजेंद्र गाडेकर पा., श्री. किशोर लंके पा.,श्री. शंकर झेंडे पा. श्री. सतीश सकट, श्री. जनार्दन भदार्गे, श्री. सहदेव झेंडे पा., श्री. सुरेश झेंडे पा., श्री. राजेंद्र गाडेकर पा., श्री. संतोष लंके पा. श्री. बाळासाहेब गाडेकर, श्री. दिलीप लंके, श्री. बाप्पू दत्तात्रय झेंडे पा., श्री अंबादास कार्ले, श्री फक्कड दिनकर झेंडे पा., श्री. संतोष झेंडे पा., श्री. दीपक झेंडे पा. श्री. सादिक तांबोळी तसेच महिला मधून सौ वृषाली दादा गायकवाड, सौ सारिका सुनिल झेंडे, सौ रिता संतोष लंके उपस्थित होत्या.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री लोंढे सोमनाथ सर यांनी अथक परिश्रम घेतले व शाळेच्या उपाध्यापिका श्रीमती ज्योती पवार मॅडम यांनी सध्याच्या शिक्षण पद्धतीमधील बदलता प्रवाह यावर मार्गदर्शन केले. श्री चौरे रविराज सर यांनी उपस्थित सर्व पाहुणे मंडळींचे स्वागत करून अध्यक्षांच्या परवानगीने आभार मानले.