Shreyas Talpade । श्रेयस तळपदेसाठी ‘ती’ 10 मिनिटं होती अत्यंत चिंताजनक, अभिनेत्याच्या प्रकृतीबाबत समोर आली मोठी माहिती

Shreyas Talpade

Shreyas Talpade । श्रेयस तळपदे हे नाव आता मनोरंजन विश्वासाठी नवीन नाही. श्रेयसने मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये (Shreyas Talpade Film) काम केले आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्याने प्रेक्षकांच्या मनावर वर्चस्व गाजवलं आहे. सध्या तो ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाच्या (Shreyas Talpade Upcoming Film) शुटींगमध्ये व्यस्त आहे. गुरुवारी शुटींगनंतर घरी आल्यानंतर त्याला हार्ट अटॅक (Shreyas Talpade Heart Attack) आला. तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याची तब्येत ठीक आहे. (Latest Marathi News)

Beed News । बीड जिल्ह्यात धक्कादायक प्रकार! कॉलेजमध्ये खुलेआम कॉपी; ढीगभर मोबाईल, खंडीभर चिठ्ठ्या जप्त, धक्कादायक व्हिडिओ समोर

मात्र आता अभिनेत्याच्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती अभिनेता बॉबी देओल याने दिली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बॉबी देओल म्हणाला, ‘माझं आताच श्रेयस याच्या पत्नीसोबत बोलणं झालं आहे. त्या प्रचंड चिंतेत होत्या… हृदयविकाराचा झटका आल्यानंतर 10 मिनिटं त्याच्या हृदयाची धडधड थांबली होती. श्रेयस याची एंजियोप्लास्टी करण्यात आली आहे. असं बॉबी देओल म्हणाला आहे.

Accident News । भीषण अपघात! लग्नाहून परतताना वऱ्हाडावर काळाचा घाला; सहा जणांचा जागीच मृत्यू

दरम्यान, श्रेयस केवळ 47 वर्षांचा असून एक अभिनेता असल्याने तो स्वत:ला फिट ठेवण्याचा प्रयत्न करतो. असे असूनही त्याला हृदयविकाराचा झटका येणे ही खरोखरच मोठी गोष्ट आहे. ही बातमी आल्यानंतर त्याचे चाहते सर्वाधिक चिंतेत होते पण सध्या तो बरा झाल्याच्या बातमीने त्यांनाही दिलासा मिळाला आहे.

Viral Video । रस्त्याच्या मधोमध जोडप्यात कडाक्याचे भांडण, मुलाला एकटे सोडले, व्हिडिओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Spread the love