Site icon e लोकहित | Marathi News

बारामतीत धक्कादायक प्रकार! महाविद्यालयीन विद्यार्थ्याला लुटलं नंतर काढले नग्न फोटो

Shocking type of Baramati! A college student was robbed and then took a nude photo

बारामती: सध्या बारामतीमधून (Baramati) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महाविद्यालयालयीन विद्यार्थ्याला लुटून त्याला नग्न करुन त्याचे फोटो काढल्याची धक्कदायक घटना बारामती येथे घडली आहे. बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयील (Govt Medical College) विद्यार्थ्यासोबत हा प्रकार घडला आहे.

धक्कादायक! राज्यातील दीडशे गावे महाराष्ट्र सोडण्याच्या तयारीत

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ डिसेंबरला रात्री ८ च्या सुमारास विद्यार्थ्याला मारहाण करत अज्ञातांनी त्याच्या खिशातील 15 हजार रुपयांची रक्कम लुटली. त्याचबरोबर फक्त रक्कम लुटून राहिले नाहीत तर त्याचे नग्न व्हिडीओ आणि फोटो (Videos and photos) देखील काढले.

Rohit Pawar: “…तर यापुढं शांत बसणार नाही”, सीमावादावर रोहित पवारांनी दिली प्रतिक्रिया

नंतर अज्ञातांनी विद्यार्थ्याला एटीएममध्ये घेवून जात त्याच्या खात्यातील 15 हजार रूपये देखील काढून घेतले आणि त्या ठिकाणाहून पळ काढला. विद्यार्थ्यांने याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस यंत्रणा (Police system) करत आहे.

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा राडा; पोलिसांनी गौतमीलाच गाडीत बसवलं अन्..

Spread the love
Exit mobile version