Site icon e लोकहित | Marathi News

धक्कादायक! भिंत तोडून मध्यरात्री दोन तरुण शिरले शाहरुख खानच्या घरामध्ये

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. मागच्या काही दिवसांपासून तो त्याच्या ‘पठाण’ या चित्रपटामुळे सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. दरम्यान, सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शाहरुखच्या घरामध्ये दोन तरुणांनी मध्यरात्री भिंत तोडून आत जाण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.

गौतमी पाटीलच्या ‘त्या’ व्हिडीओप्रकरणी कलावंत मंगला बनसोडे यांनी दिली संतप्त प्रतिक्रिया; म्हणाल्या, “हे पाहून फार वाईट…”

मध्यरात्री भिंत तोडून शाहरुखच्या मन्नत या बंगल्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. शाहरुखच्या बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न करणारे दोन तरुण गुजरातमधील असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची पोलिसांनी दखल घेतली असून मुंबई पोलिसांनी त्या दोघांना अटकदेखील केली आहे. माहितीनुसार, १९ ते २० वर्षे वयाचे ते दोन तरुण आहेत.

प्री वेडिंग शूट करायला गेले अन् फोटोग्राफरसोबत घडलं भलतंच; व्हिडीओ एकदा बघाच

हे दोन तरुण बंगल्यामध्ये प्रवेश करत असताना ड्युटीवर असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना पकडलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघेही शाहरुखचे चाहते असून ते त्याला भेटण्यासाठी या आले होते. मात्र कोणाचीही परवानगी न घेतला खासगी मालमत्तेत प्रवेश केल्याप्रकरणी पोलिसांनी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Spread the love
Exit mobile version