RCB च्या पराभवानंतर धक्कादायक ट्विट; “ऋषभ पंतच्या जागी शुभमन गिलचा अपघात…”

Shocking tweet after RCB defeat; "The accident of Shubman Gill replacing Rishabh Pant…."

IPL २०२३ : शुभम गिलने आरसीबी (Royal Challengers Bangalore) विरुद्धच्या मॅच मध्ये शानदार शतक ठोकलं. त्याच्या धडाकेबाज बॅटिंगमुळे आरसीबीचं स्वप्न पुन्हा एकदा स्वप्नच राहिलं. गेली पंधरा वर्ष आरसीबी या क्षणाची वाट बघत होती. परंतु, पुन्हा एकदा त्यांना आता वाटच बघावी लागणार आहे. आरसीबीचं प्लेऑफमध्ये जाण्याचं स्वप्न शुभमन गिलने धुळीस मिळवलं आहे. चिन्नास्वामी स्टेडियमध्ये (Chinnaswamy Stadium) शुभमनने शानदार शतक मारलं. त्यामुळे आरसीबीचं स्वप्न पुन्हा एकदा धुळीस मिळालं.आरसीबीचा (RCB) पराभव हा फक्त त्यांच्या संघाचाच पराभव नव्हता. तर फॅन्सच्या देखील खूप जीवाला लागला आहे. त्यामुळे काही लोक शुभमन गिलबद्दल खुपचं वाईट बोलले. आरसीबीने गुजरात टायटन्सला (Gujarat Titans) १९८ धावांचं मोठं लक्ष दिलं होतं. परंतु शुभमनच्या बॅटिंगमुळे गुजरातने हे लक्ष सहज पार केले.

Eggs | अंडे शाकाहारी की मांसाहारी? शेवटी प्रश्नाचं उत्तर मिळालंच…

आरसीबीच्या काही फॅन्संना, बोलताना भान राहिले नाही. आपण काय बोलतोय हे देखील त्यांना समजत नव्हते. ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) जागी शुभमन दुखापती व्हायला पाहिजे होता. ऋषभच्या जागी शुभमन त्या कारमध्ये का नव्हता? असं काही फॅन्सने मत व्यक्त केलं. ३० डिसेंबर २०२२ रोजी ऋषभच्या गाडीचा भीषण अपघात झाला होता. भारताचा Wicket-Keeper आणि Batsman असलेला ऋषभ पंत त्या गाडीमध्ये होता. दिल्लीहून डेहराडूनला जाताना त्याचा हा भीषण अपघात झाला होता. सुदैवाने पंत या अपघातातून वाचला. परंतु,अजूनही तो या अपघातातून पूर्णपणे सावरला नाही.

भर लग्न मंडपात नवरा-नवरीची एकमेकांना तुफान मारहाण, व्हिडिओही झाला व्हायरल; पाहा Video

IPL २०२३ मधून आरसीबी बाहेर निघाल्यापासून फॅन्सना मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावरही RCB च्या फॅन्सनी आपलं दु:ख ट्विटच्या आणि इंस्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केलं आहे. दरम्यान एका आरसीबी फॅनच ट्विट खूप गाजतय. त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. गिलबद्दल त्याच्या मनात खूप राग असल्याचे दिसून आले. त्याने त्याच्या ट्विटमध्ये असं म्हटलं होतं की, ऋषभचा जो भीषण कारअपघात झाला, त्या कारमध्ये शुभमन गिल का नव्हता? असं टि्वटमध्ये लिहिलेलं होतं. त्याचा अपघात झाला असता तर तो क्रिकेटच्या मैदानातून बाहेरच असता. मग आरसीबी जिंकलीच असती, असं त्यां फॅनच म्हणणं आहे.

शेवटी डॉक्टरच तो! मृत्यूनंतरही तब्बल ११ जणांना दिले जीवनदान

आरसीबीच्या हातात सगळं होतं परंतु, तरीदेखील त्यांच्या हातातून मॅच निसटली. आरसीबीमधील एक दोन खेळाडू सोडले तर, बाकी खेळाडूंचा परफॉर्मन्स एवढा प्रभावी नव्हता. या मॅचमध्ये विराट कोहलीने (Virat Kohli) सेंच्युरी मारली होती. तरीसुद्धा, मॅच हातातून निसटली. ट्रॉफी जिंकण्यासाठी संपूर्ण संघाने चांगलं प्रदर्शन दाखवणं गरजेचं आहे.

Eggs | अंडे शाकाहारी की मांसाहारी? शेवटी प्रश्नाचं उत्तर मिळालंच…

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *