Assembly Election Result 2023 । बिग ब्रेकिंग! चारही राज्यांचे धक्कादायक कल हाती, कुणाला किती मिळाल्या जागा?

Assembly Election Result 2023

Assembly Election Result 2023 । 30 नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा, आणि मिझोरम या पाच राज्यांतील (Assembly Election) मतदान प्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे सर्वांना निकालाची उत्सुकता लागली आहे. मेघालय सोडून इतर चार राज्यांचा आज निकाल असून मेघालयची मतमोजणी सोमवारी होणार आहे. ही निवडणूक म्हणजे 2024 ची (Loksabha Election 2024) सेमीफायनल म्हटली जात आहे. (Latest Marathi News)

Sanjay Raut । “शिवसेना आणि राष्ट्रवादीला संपवणे हे संघाचे षडयंत्र”, संजय राऊतांचा खळबळजनक आरोप

सकाळी दहा वाजेपर्यंत हाती आलेल्या कलानुसार भाजप (BJP) मध्य प्रदेशातील सत्ता कायम ठेवत असून राजस्थानमध्ये भाजप सत्तेत येत असल्याचे दिसत आहे. राजस्थानात दर पाच वर्षांनी सत्ताबदल होण्याचा क्रम यावर्षीही सुरु राहिला आहे. काँग्रेस (Congress) तेलंगणात बहुमताकडे वाटचाल करत आहे तर छत्तीसगडमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये (BJP vs Congress) कडवी टक्कर सुरु आहे.

Mahad News । मुलगा झाल्याचा आनंद आला अंगलट! मित्रांसोबत पोहायला गेला अन् झालं असं काही की…

राजस्थानमध्ये एकूण 199 जागांवर मतदान झाले त्यापैकी 106 जागांवर भाजपने आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस 81 जागांवर आघाडीवर आहे. मध्य प्रदेशमध्ये 230 जागांपैकी भाजपने 140 जागांवर आघाडी घेतली असून काँग्रेस 85 जागांवर आघाडीवर आहे. तसेच छत्तीसगडमध्ये 90 जागांवर मतदान झाले असून 15 वर्षांनी काँग्रेस सत्तेत आलीआहे. काँग्रेसने 45 जागांवर आघाडी घेतली आहे तर भाजप 43 जागांवर आघाडीवर आहे. तेलंगणात काँग्रेसने 61 जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपला फक्त सहा जागा मिळू शकतात.

Maharashtra Politics । ठाकरे गटाला मोठं खिंडार! चार तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी दिला सामूहिक राजीनामा

Spread the love