Site icon e लोकहित | Marathi News

धक्कादायक! वाघाच्या हल्ल्यात शेतकरी जागीच ठार; वाचा सविस्तर

Shocking! Tiger attack kills farmer on the spot; Read in detail

सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका वाघाने (Tiger) शेतात काम करत असलेल्या एका ४७ वर्षीय शेतकऱ्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूरमध्ये (Chandrapur) घडली आहे. या हल्ल्यामध्ये शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

कामवाली बाई झाली युट्युबवर हिट; पुण्याची ‘शीला दिदी’ युट्युबच्या सर्वाधिक लोकप्रिय व्हिडिओंच्या यादीत आघाडीवर

सूत्रांनी दिलेलय माहितीनुसार कैलास लक्ष्मण गेडेकर असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. कैलास गेडेकर हे मंगळवारी सरपण आणण्यासाठी सावली वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या उपक्षेत्र व्याहाड, नियतक्षेत्र सामदा, कक्ष क्र. २०१ मध्ये गेले होते.

रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मधोमध अडकली मुलगी, आरपीएफ जवानांनी वाचविले प्राण; पाहा VIDEO

मात्र, घरी येणास त्यांना उशीर झाल्याने कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांनी त्यांचा शोध घेण्यास सुरवात केली. बुधवारी सकाळच्या सुमारास वनविभागाच्या कैलासचा मृतदेह आढळून आला. यावेळी त्यांच्या कुटुंबियांना आणि गावकऱ्यांना धक्काच बसला.

10 मिनिटांत घरी बसल्या बनवा पॅनकार्ड; ऑनलाइन पॅनकार्ड तयार करण्याची सोपी पद्धत

Spread the love
Exit mobile version