Site icon e लोकहित | Marathi News

धक्कादायक! तंबाखू खाण्यासाठी पैसे न दिल्याने मुलाने घेतला आईचा जीव

Shocking! Son took his mother's life for not paying for tobacco

पुणे (Pune) जिल्ह्यातील जुन्नर (Junnar) तालुक्यातील शिरोलीआळी या भागातून सध्या एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलगा आणि आईच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. तंबाखूसाठी आईने मुलाला पैसे दिले नाहीत म्हणून संतापलेल्या मुलाने आईच्या डोक्यात फावडे मारुन हत्या केली आहे. या घटनेमुळे तेथील परिसरात खळबळ उडाली आहे.

आफताब बाप होणार होता?; तरीही केली श्रद्धाची हत्या

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा आईकडे तंबाखू खाण्यासाठी पैसे मागत होता पण त्याच्या आईने मुलाला तंबाखूसाठी पैसे दिले नाहीत. यावरून दोघांमध्ये वाद झाला असून संतापलेल्या मुलाने रागाच्या भरात त्याने आईवरच फावड्याने हल्ला केला. आणि या हल्ल्यात दुर्दैवाने आईचा मृत्यू झाला.

खुशखबर! आयटी क्षेत्रात 2 लाख तरुणांना नोकरीची संधी मिळणार

आता या प्रकरणाबाबत पोलिसांनी मुलाला अटक केली आहे. माहितीनुसार, तरुणाला तंबाखू खाण्याचे वेसण खूप दिवसापासून होते. तो कायम त्याच्या आईकडे पैसे मागत असे यावरून त्या दोघांचे वाद देखील होत. पण यावेळी वाद एवढा टोकाला पोहचला की त्या आईला जीव गमवावा लागला

Ajit Pawar: अजित पवारांच्या अडचणीत वाढ? शिखर बँक घोटाळा प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयामध्ये आज सुनावणी

Spread the love
Exit mobile version