Site icon e लोकहित | Marathi News

धक्कदायक! पाकिस्तानमध्ये नमाजादरम्यान मशिदीत बॉम्बस्फोट; अनेकजण गंभीर जखमी

Shocking! Mosque bomb blasts during prayers in Pakistan; Many were seriously injured

पाकिस्तान (Pakistan) येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. पेशावर येथील मशिदीत आज (दि. 30) दुपारी बॉम्बस्फोट झाला. यामध्ये अनेकांचा जीव गेला असून यामुळे पाकिस्तान पुन्हा एकदा हादरला आहे. पोलीस लायन्स मशिदीत जोहर नमाजादरम्यान ही घटना घडली आहे. यामध्ये 28 लोकांचा मृत्यु झाला असून 150 लोक गंभीर जखमी आहेत.

ऋषभ पंतच्या तब्येतीबाबत समोर आली सर्वात मोठी अपडेट!

हा बॉम्बस्फोट इतका भयंकर होता की, यामध्ये चक्क मशिदीच छत उडाल आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा हल्ला आत्मघातकी होता. यातील मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या हल्ल्यात पोलीस कर्मचाऱ्यांचा देखील मृत्यु झाला आहे.

रिलस्टार आदित्य सातपुते अडकला लग्नबंधनात; पाहा लग्नाचे फोटो

दरम्यान जखमींची परिस्थिती गंभीर आहे. तसेच अनेक मृतदेह मशिदीत अडकल्याची भीती व्यक्त केली गेली आहे. पाकिस्तान आर्मीने (Pakistan Army) हा परिसर घेरला असून या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याठिकाणी सध्या मोठ्याप्रमाणात भीतीचे वातावरण आहे.

KGF स्टार यश साकारणार रावणाची भूमिका

Spread the love
Exit mobile version