
सध्या दिल्लीमधून (Delhi) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिल्लीतील शाहबाद डेअरी परिसरात 16 वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तरुणीला लोकांसमोर रस्त्याच्या मधोमध निर्दयीपणे भोसकण्यात आले. तेथील परिसरात या घटनेने खळबळ उडाली आहे. (Delhi Crime)
मलायकाने अर्जुनचा सेमी न्यूड फोटो केला व्हायरल; नेटकरी भडकले! म्हणाले, “तुझ्या मुलाच्या…”
ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या घटनेचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की एका व्यक्तीने मुलीवर चाकूने अनेक वार केले आणि त्यांनतर जोरदार दगडाने देखील वार केले. ज्या ठिकाणी मुलीवर चाकूने वार केले जात आहेत त्या ठिकाणाहून लोक जातानाही दिसत आहेत. पण कोणीही हस्तक्षेप केला नाही.
बिग ब्रेकिंग! मुंबईमध्ये आमदाराच्या घरात २५ लाखांची चोरी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीची हत्या करणारे हे तिचेच मित्र आहेत. आरोपी आणि तरुणी हे मित्र होते, मात्र काल त्यांच्यात काही कारणावरून भांडण झाले. यावेळी रस्त्यात अडवून तिची हत्या करण्यात आली. आरोपी फारार असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
कांद्याला बाजार नसल्यामुळे शेतकरी चिंतेत! खर्च केलेले पैसे निघत नसल्याने शेतकऱ्याने कांदा पेटवला