Site icon e लोकहित | Marathi News

धक्कादायक! इलेक्ट्रिक स्कुटरच्या बॅटरीचा स्फोट होऊन ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

7-year-old boy dies after electric scooter battery explodes

वसई : आपण आपल्या फायद्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करतो. पण हेच नवीन तंत्रज्ञान आपल्या जीवावर देखील बेतू शकते. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इलेक्ट्रिक स्कुटरच्या (Electric scooter) बॅटरीच्या झालेल्या स्फोटात सात वर्षीय चिमुरड्याचा भाजून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना वसई मध्ये घडली आहे.

Satara: साताऱ्यात बुरखा घालून प्रेयसीला भेटायला गेला प्रियकर, मुलं चोरणारी टोळी समजून नागरिकांनी केली बेदम मारहाण

सूत्रांच्या माहितीनुसार, चार्जिंगसाठी लावलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीचा स्फोट झाला. आणि या स्फोटात सात वर्षीय चिमुरड्याला आपला जीव गमवावा लागलाय. वसई (Vasai) मधील रामदासनगर येतेच राहणाऱ्या शाहनवाज अन्सारी यांनी रात्रीच्या वेळी आपल्या घरामध्ये. इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी चार्ज करण्यासाठी ठेवली होती. पण पहाटेच त्या बॅटरीचा भीषण स्फोट झाला.

Raj Thackeray: “…म्हणूनच गांधीजींसारखा”, गांधी जयंती निमित्त राज ठाकरेंनी शेअर केली फेसबुक पोस्ट

घरामध्ये लहान चिमुकला झोपलेला होता. या स्फोटामुळे चिमुकल्याला त्याचा जीव गमवावा लागला. या घटनेने संपूर्ण परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.

Malaika Arora: घटस्फोटाबद्दल केलेले मलायका अरोराचे वक्तव्य चर्चेत, म्हणाली, “आता आमच्यात चांगले…”

Spread the love
Exit mobile version