
महाराष्ट्रात काही संस्थाने विशेष प्रसिद्ध आहेत. शिर्डीचे साईबाबा संस्थान ( Saibaba Trust, Shirdi) हे यातीलच एक आहे. कोरोनाकाळात इतर संस्थानांप्रमाणेच हे संस्थान देखील बंद होते. परंतु निर्बंध कमी झाल्यानंतर साईबाबांच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. दरम्यान या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
सावधान! दिल्लीमध्ये डास मारण्याच्या कॉईलमुळे गेला कुटुंबातील सहा जणांचा जीव
रामनवमी उत्सवाच्या सांगतेच्या दिवशीच शिर्डीमध्ये सुरक्षा रक्षक आणि साईभक्तांमध्ये (Sai Baba) मारहाण झाल्याची घटना घडल्याचं समोर आलं आहे. सोशल मीडियावर याबाबतचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. माहितीनुसार, शिर्डी पोलीसांनी भक्ताच्या तक्रारीवरून सुरक्षारक्षकाच्या विरोधात गुन्हा देखील दाखल केला आहे.
“…तर गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्या” सुप्रिया सुळे यांचा फडणवीसांवर हल्लाबोल
यामुळे त्या परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचबरोअबर भक्तांनी दर्शन घेताना नियम व्यवस्थित पाळले पाहिजेत. तसेच सुरक्षा रक्षकांनी देखील अशा प्रसंगी कायदा हातात न घेता याबाबत पोलिसांना माहिती दिली पाहिजे असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.