Site icon e लोकहित | Marathi News

Sharmila Thackeray: शिवसेना नेमकी शिंदे गटाची की ठाकरेंची, शर्मिला ठाकरेंनी दिलं उत्तर

Sharmila Thackeray replied that Shiv Sena belongs to the Shinde group or to Thackeray

मुंबई : जस शिंदे गटाने बंड करून भाजपसोबत सरकार स्थापन केलय तेव्हापासून शिंदे गटात(Shinde group) आणि ठाकरे यांच्यात शिवसेना(Shivsena) कोणाची याबाबत वाद सुरू आहे. त्यामुळे खरी शिवसेना कुणाची?, शिंदेंची की ठाकरेंची?, यातील वाद आता न्यायालयात पोहचला आहे. दरम्यान आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी या प्रकरणात उडी घेऊन शिवसेना नेमकी कोणाची याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

Sharmila Thackeray : ” मुंबई-गोवा महामार्गाकडे लक्ष द्या , शर्मिला ठाकरेंनी सांगितला नितीन गडकरिंसोबतचा ‘तो’ किस्सा

तसेच सरन्यायाधीश व्ही. एन. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील उद्या शिवसेना आणि शिंदे गटाने दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी होणार आहे.पुण्यात माध्यमांशी बोलताना शर्मिला ठाकरे(Sharmila Thackeray) म्हणाल्या की, कोणताच पक्ष संपत नसतो. शिवसेना पक्षातील खालच्या पदाधिकाऱ्यांची अजूनही बाळासाहेब यांच्यावर निष्ठा आहे. खरी शिवसेना कोणती हे सुप्रीम कोर्ट ठरवेल, असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या.

Tamhini Ghat : ताम्हिणी घाटात भीषण अपघात, कार 200 फूट घसरली, 3 जण जागीच ठार

पुढे बोलताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या की,राज आणि उद्धव ठाकरे ही दोन्ही भावंडं एकत्र आल्यास आनंदच होईल.समोरून एकत्र येण्यासंदर्भात साद आल्यास राज ठाकरे नक्कीच विचार करतील.कितीही मतभेद असले तरी संकटकाळात ठाकरे कुटुंबीय एकत्र येते हे सर्व महाराष्ट्र जाणतो अस शर्मिला ठाकरे म्हणाल्या.

Spread the love
Exit mobile version