
राज्यात मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस फुटण्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपसोबत जातील अशी शक्यता मध्यंतरी वर्तवली जात होती. एवढंच नाही तर भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेस ( NCP) फोडण्याचा डाव सुरू आहे. असे देखील म्हंटले जात होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar) यानी आज आपली भूमिका मांडली आहे.
“माझ्या मुलाला आमदार करा, तो फक्त १ रुपयात…”, शेतकरी आईचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
अमरावतीच्या दौऱ्यावर असताना माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले की, ” भाजपच्या फोडाफोडीवर वेळ आल्यावर योग्य ती भूमिका घेऊ. तसेच भाजपने कोणाला फोडण्याचा प्रयत्न केलाच तर उत्तर देऊ.” फोडाफोडीच्या राजकारणासाठी शरद पवारांनी भाजपला दिलेल्या या इशाऱ्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे.
अजितदादांना वगळले अन् राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यांना दिली संधी; शरद पवारांचा अजित पवार यांना दणका
२०१९ नंतर विविध पक्षातील राजकीय नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. २०२४ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील आता अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. यासाठी ‘भाजप फोडा व राज्य करा’ हे सूत्र वापरत असून त्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करत दबावतंत्र आजमावत आहे. म्हणूनच शरद पवारांनी जहाल शब्दात भाजपला सुनावले आहे.
अमृता फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवार यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…