Sharad Pawar । शरद पवारांना राष्ट्रवादी नाव अन् पक्षचिन्ह परत मिळणार? महत्वाची माहिती समोर

Sharad Pawar And Ajit Pawar

Sharad Pawar । निवडणूक आयोगाने (Election Commission) अजित पवार (Ajit Pawar) यांचाच गट खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याचा निकाल दिला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निर्णय देत अजित पवार यांच्या गटाला मूळ राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली. यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला.

Viral CCTV Footage । पाण्याची मोटार चोरल्याच्या संशयावरून दोघांना बेदम मारहाण, दोघांचाही मृत्यू; सीसीटीव्ही फुटेज समोर

दरम्यान आता निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने (Sharad Pawar) सुप्रीम कोर्टात धाव घेतली असून याबाबत याचिका दाखल केली. या याचिकेवर आज महत्वाची सुनावणी पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती के.व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे.

Ritesh Deshmukh । … अन् रितेश देशमुखला मंचावर अश्रू अनावर, नेमकं कारण काय?

या याचिकेच्या माध्यमातून शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबतची सुनावणी लवकरात लवकर घ्यावी, अशी विनंती देखील करण्यात आली आहे. त्यामुळे आता शरद पवार यांना पक्ष आणि चिन्ह परत मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Dangal Fame Suhani Bhatnagar । ‘दंगल गर्ल’ सुहानीचा या आजारामुळे मृत्यू झाला; वडिलांनी केला मोठा खुलासा

Spread the love