
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राहुल गांधी यांना मोठा धक्का बसल्याचे समजले जात आहे. सुरत कोर्टाने राहुल गांधी ( Rahul Gandhi) यांना मानहानी प्रकरणात दोषी ठरवले असून त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. यानंतर त्यांना जामीन देखील मंजूर झाला. मात्र दोन वर्षाची शिक्षा सुनावल्यामुळे त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. आता यावर अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. यामध्येच आता शरद पवार यांनी देखील प्रतीक्रिया दिली आहे
“… हा आपल्या देशात गुन्हा ठरलाय”, राहुल गांधींची खासदारकी जाताच उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
शरद पवार यांनी याबाबत ट्विट केले आहे. ट्विट करत त्यांनी लिहिले की, “राहुल गांधी यांना लोकसभेचे खासदार म्हणून अपात्र ठरवणे हे संविधानाच्या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात आहे, जिथे लोकशाही मूल्यांना छेद दिला जात आहे. हे निषेधार्ह आणि संविधान ज्या तत्त्वांवर आधारित आहे त्या तत्त्वांच्या विरोधात आहे”. असं शरद पवार म्हणाले आहेत.
“…अन् अमरीश पुरीने सेटवर गोविंदाच्या लगावली होती कानशिलात”; ‘या’ कारणामुळे झालं होतं भांडण
त्याचबरोअबर पुढे ते म्हणाले, “आपली राज्यघटना प्रत्येक व्यक्तीला न्यायाच्या अधिकाराची हमी देते. विचार स्वातंत्र्य, दर्जा आणि संधीची समानता आणि प्रत्येक भारतीयाच्या सन्मानाची खात्री देणारा बंधुभाव असल्याचं शरद पवार यांनी म्हंटल आहे.
Our constitution guarantees the right of each Individual to fair justice; liberty of thought; equality of status and opportunity and fraternity assuring the dignity of each Indian. #RahulGandhi
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 24, 2023
2024 ची लोकसभा निवडणूक राहुल गांधींना लढवता येणार का? पाहा नेमका कायदा काय सांगतो