Sharad Pawar । शरद पवारांच्या निर्णयाने पक्षातील इतर नेते नाराज; पक्षामध्ये अंतर्गत कलह सुरू होणार?

Sharad Pawar. Other party leaders upset with Sharad Pawar's decision; Will there be internal strife in the party?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar) यांनी नुकतीच निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून सर्वत्र उलटसुलट चर्चा सुरू आहे. दरम्यान या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात अंतर्गत कलह सुरू झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय शरद पवारांनी पक्षातील इतर नेत्यांना विश्वासात घेऊन घ्यायला हवा होता. अशी इतर नेत्यांची भावना आहे.

अजित पवार यांना भाजपासोबत जाण्याची वाट मोकळी करण्यासाठी शरद पवारांचा निवृत्तीचा निर्णय? चर्चांना उधाण

शरद पवारांनी एवढा मोठा निर्णय फक्त कुटुंबातील लोकांना विश्वासात घेऊन घेतला. मात्र त्यांनी निर्णय घेताना पक्षातील इतर वरिष्ठ नेत्यांना गृहीत धरले. यामुळे पक्षातील नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. शरद पवारांच्या अध्यक्षपदाचा निर्णय या त्यांच्या कुटुंबाचा वैयक्तिक निर्णय नाही. राष्ट्रवादी हा एक पक्ष आहे. एका मोठ्या पक्षातील नेता पक्षातील लोकांना कसलीच कल्पना न देता अचानक निर्णय घेतात. हे पक्षातील बाकी नेत्यांना पटलेले नाही. ( Another ledaers form NCP are disappointed with Sharad Pawar’s descision)

मोठी बातमी! गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्याला पोलिसांनी केली अटक

दरम्यान पक्षातील नेते नाराज असल्याचे समजल्यानंतर शरद पवार यांनी खंत व्यक्त केली आहे. ” पक्षाच्या नेत्यांची ६ मे ला होणारी बैठक ५ मे ला घ्या. समिती जो निर्णय घेईल तो निर्णय मला मान्य असेल. मी पक्षातील वरिष्ठ नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना
विश्वासात घ्यायला हवं होतं. असं मला आता जाणवत आहे.” अशी भावना शरद पवारांनी व्यक्त केली आहे.

खुशखबर! महागाई भत्त्यात झाली वाढ; सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *