Site icon e लोकहित | Marathi News

शरद पवारांनी काँग्रेसच्या बैठकीत राहुल गांधींना सुनावले खडे बोल; म्हणाले…

Sharad Pawar gave harsh words to Rahul Gandhi in Congress meeting; said…

सध्या राहुल गांधी यांची खासदारपदावरुन करण्यात आलेली हकालपट्टी आणि राहुल गांधींनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन महाराष्ट्र राज्यात चांगलचं वातावरण तापलेलं दिसून येत आहे.

बिग ब्रेकिंग! देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याची धमकी

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची शनिवारी पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देतात माफी मागायला मी काही सावरकर नाही असं वक्तव्य केलं होत. उद्धव ठाकरेनींदेखील गांधींच्या या वक्तव्याचा निषेध केल्याचं पहायला मिळालं. सावकराबाबतीत करण्यात येणारे विधान खपवून घेतलं जाणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

मोठी बातमी! रत्नागिरीत आढळला ‘रामगड’ किल्ला

आता यामुळं काँग्रेस (Congress)आणि शिवसेनेत ठिणगी पडण्याची शक्यता आहे. अशातच खुद्द राष्ट्रवादीच सर्वेसर्वा शरद पवार उद्धव ठाकरेंसाठी मैदानात उतरले आहेत. दिल्लीत सर्वविरोधी पक्षाची बैठक पार पडली. यावेळी शरद पवारांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यामुळे आता सगळ्या प्रकरणाला फुल स्टाॅप लागण्याची शक्यता आहे. या बैठकीमध्ये शरद पवार यांनी राहुल गांधी यांना चांगलंच सुनावलं आहे.

मोठी बातमी! आमदार संजय शिरसाट यांच्यावर गुन्हा दाखल होणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

सावरकर हे विज्ञानवादी होते. त्याचा आणि RSS चा काही संबध नाही आहे. त्यामुळं सावरकरांना माफीवीर म्हणून हिणवणं चुकीच असल्याचं शरद पवार म्हणाले. महाराष्ट्रात सावरकरांच्या मुद्यावरुन महाविकास आघाडी होत आहे. असं शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले. यावर बैठकीला उपस्थित खासदारांनीही सहमती दर्शवली.

Jio ने लॉन्च केला सर्वात स्वस्त ब्रॉडबँड इंटरनेट प्लॅन! जाणून घ्या याबद्दल…

Spread the love
Exit mobile version