
Sharad Pawar । लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. मात्र, आत्तापर्यंत भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही, मात्र निवडणूक आयोग फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीच्या तारखा जाहीर करेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या निवडणुकांच्या तयारीसाठी सर्व राजकीय पक्ष कामाला लागली आहेत.
Milind Deora । मिलिंद देवरा यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले सर्वात मोठे गिफ्ट!
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर महाविकास आघाडीने कंबर कसलीय. महायुतीला पराभूत करण्यासाठी आता स्वत: शरद पवार मैदानात उतरलेत. (Politics News) लोकसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर शरद पवार राज्यभर दौरा करणार आहेत. भाजपला (BJP) पराभूत करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर देखील इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी तयारी सुरू केली आहे.
Ajit Gopchade । भाजपकडून राज्यसभेचे तिकीट मिळवणारे अजित गोपछडे नेमके कोण आहेत?
महत्वाची गोष्ट म्हणजे लोकसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) (शरदचंद्र पवार गट) पश्चिम महाराष्ट्रावर विशेष लक्ष केंद्रित करणार असल्याची माहिती मिळत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, राज्यातील १२ ते १३ जागा शरद पवार गटाला मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान महाविकास आघाडीचा जागावाटपासंदर्भात अजून कोणताच ठोस निर्णय झालेला नाही. मात्र लवकरच जागावाटप होणार आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
Rajya sabha election 2024 । ‘या’ माजी महिला आमदाराला भाजपने दिली राज्यसभेची उमेदवारी