Site icon e लोकहित | Marathi News

आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या ‘त्या’ चॅलेंजवरून शंभुराज देसाई संतापले; म्हणाले, “हिंमत असेल तर…”

Shambhuraj Desai angered by Aditya Thackeray's 'that' challenge to CM; Said, "If you dare..."

शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (Shiv Sena leader Aditya Thackeray) यांनी राजीनामा देण्याचं आव्हान करत मुख्यमंत्र्यांना एक चॅलेंज दिलं आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, मी वरळीतून राजीनामा देतो. हिंमत असेल तर तुम्ही माझ्या विरोधात वरळीतुन लढवून दाखवा असं ओपन चॅलेंज आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. आता यावर शंभुराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उमेदवारी जाहीर होताच हेमंत रासने दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला पोहचले!

शंभुराज देसाई म्हणाले, वरळी मतदासंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान देण्याआधी हिंमत असेल तर पाटण मतदारसंघात उभं राहा आणि निवडणूक लढवून दाखवा, असं आव्हान शंभुराज देसाई यांनी आदित्य ठाकरे यांना दिले आहे.

कसबा-चिंचवड पोटनिवडणुकांसाठी टिळक कुटुंबाला उमेदवारी देणं का डावललं? चंद्रकांत पाटील म्हणाले…

नेमकं काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?

वरळीतून उभा राहा तुम्हाला जेवढी ताकद लावता येईल तेवढी ताकद लावा. जेवढे खोके लावायचे ते लावा मात्र एकही मत विकलं जाणार नाही. शिवसैनिक विकला जाणार नाही, असं सांगत आदित्य ठाकरे यांनी वरळीतून उभं राहा. तुम्हाला पाडणारच, असं आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल आहे.

बिग ब्रेकिंग! कसबा-चिंचवड पोटनिवडणुकांसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर

Spread the love
Exit mobile version