Site icon e लोकहित | Marathi News

तारक मेहता फेम शैलेश लोढांनी घेतला संन्यास? फोटो व्हायरल

Shailesh Lodha of Tarak Mehta fame took Sannyas? The photo went viral

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Tarak Mehata Ka Ulta Chashma) ही हिंदी टेलिव्हिजन वरील प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. गेली 13 वर्षे ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. यातील बहुतेक पात्रे आता लोकांच्या रोजच्या आयुष्यातील भाग झाली आहेत. दरम्यान या मालिकेतील काही महत्त्वाची पात्रे आता मालिका सोडून जात आहेत. अभिनेते शैलेश लोढा म्हणजेच मालिकेतील तारक मेहता यांनी देखील काही दिवसांपूर्वी ही मालिका सोडली.

ब्रेकिंग! कसबा-चिंचवड पोटनिवडणुकांसाठी भाजपचे उमेदवार जाहीर

मात्र सध्या शैलेश लोढा यांच्याबाबत एक वेगळीच चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. शैलेश लोढा यांनी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका सोडून संन्यास घेतला का? असा प्रश्न नेटकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय. त्याच झालंय असं की, शैलेश लोढा (Shailesh Lodha) यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंट वर काही फोटो नुकतेच शेअर केले आहेत.

कोल्ड्रिंक्सने भरलेला कंटेनर पलटी; कोल्ड्रिंक्स नेण्यासाठी लोकांची तुफान गर्दी

यामध्ये त्यांनी अगदी संन्यासी व्यक्तीसारखा लुक केला आहे. पिवळ्या रंगाचे धोतर, उपरणे, कपाळाला भस्म, गळयात फुलांची माळ यामुळे शैलेश लोढा हे संन्यासी व्यक्तीसारखे दिसत आहेत. हे फोटो शेअर करताना त्यांनी ‘हमको मन की शक्ती देना, मन विजय करे’ असे कॅप्शन दिले आहे. विशेष म्हणजे फोटोची पार्श्वभूमी देखील मंदिर दिसत आहे. यामुळे शैलेश लोढा यांनी खरंच संन्यास घेतला अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे.

मोठी बातमी! नाशिकच्या गोल्डमॅनला 22 कोटींच्या आर्थिक घोटाळ्याखाली अटक

Spread the love
Exit mobile version