Site icon e लोकहित | Marathi News

Shahnaz Gill: मध्यरात्री लालबाग राजाचे दर्शन घेण्यासाठी पोहोचली शहनाज गिल; पाहा VIDEO

Shahnaz Gill reached Lalbagh Raja at midnight; Watch the VIDEO

मुंबई : मुंबईतील ‘लालबागचा राजा’चे दर्शन घेण्यासाठी राजकीय व्यक्ती, सेलिब्रिटी त्याचबरोबर परदेशातून देखील लोक येत असतात. गेली दोन वर्ष कोरोनाने थैमान घातले होते पण यावर्षी कोरोना कमी झाल्याने राज्य सरकारने सर्व निर्बंध घेतले. त्यामुळे राज्यात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येत आहे. लालबाग नगरी गणरायाच्या आगमनाने सजली आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मराठीसह बॉलिवूड सेलिब्रिटी देखील हजेरी लावताना दिसतायेत. आता यामध्ये ‘बिग बॉस’ फेम शहनाज गिलने देखील हजेरी लावली आहे.

शेतकऱ्यांनो आता कायमचे वीजबिल वाचवा, घ्या मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा लाभ

सध्या सर्व नागरिक गणेशेत्सवामध्ये मग्न असल्याचे चित्र दिसत आहे. सध्या एक भक्तिमय वातावरण तयार झाले आहे. अशातच शहनाजने आता इतर सेलिब्रिटींप्रमाणेच लालबाग राजाचे दर्शन घेणयासाठी हजेरी लावली. यादरम्यान तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

Girish Bapat: “मी पक्षावर नाराज”, गिरीश बापट यांचा भाजपला घरचा अहेर

शहनाज गिल सोमवारी मध्यरात्री तिच्या भावासोबत लालबाग राजाचे दर्शन घेण्यासाठी पोहचली. यावेळी पापाराझी छायाचित्रकारांनी तिला घेरलं. यादरम्यान ती एका वेगळ्याच कारणामुळे ती चर्चेत आली. या व्हिडीओमध्ये अभिनेता दिवंगत सिद्धार्थ शुक्लाची देखील झलक पाहायला मिळाली. शहनाजचा भाऊ शाहबाजच्या हातावर सिद्धार्थच्या चेहऱ्याचा टॅटू पाहायला मिळाला. या टॅटूने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

Spread the love
Exit mobile version