
मुंबई : देश स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. ‘हर घर तिरंगा’ मोहिमेसाठी लोक घरोघरी राष्ट्रध्वज लावत आहेत. बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान त्याच्या कुटुंबासह या उत्सवात सामील झाला आणि मन्नत या त्याच्या निवासस्थानी राष्ट्रध्वज फडकवला. शाहरुखने रविवारी संध्याकाळी पत्नी गौरी खान आणि मुलांसोबत तिरंगा फडकवतानाचा व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केला.
शाहरुख आणि गौरी यांनी त्यांची मुले आर्यन आणि अबराम यांच्यासोबत तिरंगा फडकावला. प्रत्येकाने पांढरा पोशाख परिधान केला होता. शाहरुख, आर्यन आणि अबराम यांनी पांढरा टी-शर्ट परिधान केला होता. त्याचवेळी गौरी खान ऑफ व्हाइट ब्लेझरमध्ये होती.
शाहरुख खानने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले की, “आमच्या लहान मुलांना आणि येणाऱ्या पिढीला हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आमच्या क्रांतिकारकांनी किती बलिदान दिले आहे हे शिकवण्यासाठी अजून वेळ लागेल. प्रेम आणि आनंद वाटला., “आमच्या लहान मुलांना आणि येणाऱ्या पिढीला हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आमच्या क्रांतिकारकांनी किती बलिदान दिले आहे हे शिकवण्यासाठी अजून वेळ लागेल. प्रेम आणि आनंद वाटला.