
Samruddhi Mahamarg Accident । समृद्धी महामार्ग (Samriddhi highway) मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. कारण या महामार्गावरील अपघाताची मालिका (Samriddhi highway accident) थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. या महामार्गावर झालेल्या अपघातात आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमावावा लागला आहे. सध्या असाच एक भीषण अपघात (Accident) झाल्याची माहिती समोर आली आहे.
Baramti । सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांची गळाभेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल सावंगी परिसरात समृद्धी महामार्गावर शुक्रवारी (ता. ८) भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट समोरील ट्रकला पाठीमागून धडकली आणि भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, या भीषण अपघातामध्ये कारमधील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले आहेत.
Uddhav Thackeray । उद्धव ठाकरे गटाचा सर्वात मोठा दावा; दोन, तीन दिवसात…
सध्या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील हर्सुल सावंगी परिसरातील नागपूर कॉरिडॉर चैनल क्रमांक ४३६ वर हा अपघात झाला आहे. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याचे बोलले जात आहे.
Supriya Sule । रोहित पवारांच्या ईडी कारवाईनंतर सुप्रिया सुळेंनी दिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाल्या…