
आपल्या देशात परदेशी शिक्षणाचे प्रचंड आकर्षण आहे. मात्र एक रशियन मुलगा चक्क महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत आपले शिक्षण घेतोय. विशेष म्हणजे हा मुलगा शाळेच्या वातावरणात प्रचंड रमून गेलेला आहे.
सिंधुदुर्ग मधील आजगाव गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हा मुलगा शिक्षण घेत आहे. मिरॉन असे या मुलाचे नाव आहे. अवघ्या काही दिवसांत मिरॉनने मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न केला आहे. इतकंच नाही तर तोडक्यामोडक्या मराठी भाषेत तो शिक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे देखील देतो.
के एल राहुलने शेअर केले हळदीचे फोटो; पाहा PHOTO
त्याच झालंय असं की, डायना लुकेशिवी, तिचा पती व त्यांचा ११ वर्षांचा मुलगा मिरॉन (Miron) भारतात सहा महिन्यांच्या पर्यटनासाठी आले आहेत. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात फिरत असताना मिरॉन आणि त्याच्या पालकांना आजगावची जिल्हा प्राथमिक शाळा नजरेस पडली. मिरॉनला अगदी कमी वेळात या झेडपी शाळेचा लळा लागला.
मोठी बातमी! अभिनेत्री राखी सावंतच्या आईचे निधन
मागील महिनाभरापासून मिरॉन या शाळेत शिकत आहे. या मुलांसोबत तो मराठीमध्ये शिक्षण घेतोय. महत्त्वाची बाब म्हणजे या शाळेने त्याला गणवेश देखील दिला आहे. शाळेतील इतर विद्यार्थ्यांसोबत तो खेळांमध्ये, कवायती आणि सकाळच्या प्रार्थनेतही सहभाग घेत आहे. दरम्यान मिरॉनचे या शाळेतील व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहेत.
शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! किसान सन्मान निधीच्या रकमेत वाढ होणार?