
Monsoon session । मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज सहावा दिवस आहे. आजही विरोधकांनी अधिवेशनाच्या सुरूवातीलाच विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आज विधानभवनातील (Vidhan Bhavan) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ भर पावसात एकटेच आंदोलनाला बसले आहेत. (Latest Marathi News)
दरम्यान, कर्जत जामखेड (Karjat Jamkhed) मतदारसंघामध्ये पाटेगाव खंडाळा येथे औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्याचा प्रस्ताव हा शासन स्तरावर प्रस्तावित असून या औद्योगिक क्षेत्राची अधिसूचना जाहीर करून या संदर्भातील बाबी पूर्ण करण्याकरिता उद्योग मंत्र्यांसोबत रोहित पवारांनी पत्रव्यवहार केला. तरीही अधिसूचना जाहीर होत नाही. त्यामुळे सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी ते आंदोलनाला बसले आहेत.
Ajit Pawar । आमदारांच्या निधी वाटपात ‘दादा’गिरी? अजित पवारांनी अखेर सोडलं मौन, म्हणाले…
विशेष म्हणजे भर पावसात त्यांचे हे आंदोलन सुरु आहे. मंत्री गिरीश महाजन, आमदार शशिकांत शिंदे, जयंत पाटील यांनी देखील रोहित पवार यांची भेट घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सरकारने त्यांची समजूत घालून त्यांनी सभागृहात येऊन आपलं मत मांडवे असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) म्हणाले आहेत.
Adani Group । ब्रेकिंग न्यूज! गौतम अदानींनी विकली 1,600 कोटींची कंपनी