Site icon e लोकहित | Marathi News

रोहित पवार यांना आवरला नाही हुरडा खायचा मोह; म्हणाले, “थंडी आणि हुरडा हे एक..”

Rohit Pawar could not resist the urge to eat scraps; Said, "Cold and hurda are one.."

कर्जत-जामखेडचे (Karjat-Jamkhed) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे नेहमी जनतेसाठी कुठल्याही परिस्थितीत मदतीला धावून जातात. रोहित पवार यांची एक संवेदनशील, तत्पर व कृतिशील ‘लोकप्रतिनिधी ‘ म्हणून राज्यात ओळख आहे. रोहित पवार निरनिराळ्या माध्यमातून आपत्तीच्या (disaster) निवारणासाठी काम करतात. त्याचबरोबर आपल्या विविध प्रतिक्रिया आणि ट्विट्समुळे देखील रोहित पवार कायम ते चर्चेत असतात.

“उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकरांना समाज द्यावी” – सचिन खरात

सध्या त्यांच्या एकदा ट्विटमुळे आमदार रोहित पवार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आपल्या हुरडा खायचा मोह कसा आवरला नाही ते त्यांनी ट्विटरवर फोटो शेअर करत सांगितले आहे.

अजित पवार यांच्यावर टीका करण्याऱ्या पडळकरांना जितेंद्र आव्हाडांचे उत्तर, म्हणाले…

“थंडी आणि हुरडा हे एक समीकरणच आहे..! आज दौरा संपवून परतीच्या वाटेवर असताना एक भगिनी हुरडा विकताना दिसली ते पाहून हुरडा खाण्याचा मोह आवरता आला नाही.” असं कॅप्शन देत रोहित पवार यांनी ट्विटरवर काही फोटो शेअर केले आहेत. या ट्विट केलेल्या या फोटोंमध्ये रोहित पवार हे हुरडा विकणाऱ्या ताईकडून हुरडा विकत घेऊन तो खाताना दिसतायेत. आता त्यांच्या या ट्विटवर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अजित पवार यांच्यावर टीका करताना गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली; म्हणाले…

Spread the love
Exit mobile version