Site icon e लोकहित | Marathi News

रिझर्व्ह बँक ग्राहकांना मोठा झटका देण्याच्या तयारीत!

Reserve Bank preparing to give a big blow to customers!
नवी दिल्ली |अनेक नवीन गोष्टी आपल्याला घेण्याची इच्छा असते. त्यामुळे अनेक वेळा आपण लोन घेण्याचा विचार करतो. त्यासाठी बँक आपल्याला कर्ज देण्यास तयार असतात. मात्र आता कर्ज (loan) घेणाऱ्यांची देखील चिंता वाढली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) पुन्हा एकदा लोकांना धक्का देण्याची शक्यता आहे.

पुढील महिन्यात होणाऱ्या चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) बैठकीत रिझर्व्ह व्याजदरात वाढ करण्याची शक्यता आहे.या बैठकीत 25 बेसिस पाॅइंट्सने वाढ करण्याचा निर्णय या बैठकीत घेतला जाऊ शकतो.सदरच्या बैठकीत समिती उच्च किरकोळ चलनवाढ आणि विकसित देशांच्या मध्यवर्ती बँका इत्यादींचा विचार करेल. 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याआधी देखील महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाच वेळा रेपो दरात (Repo rate) वाढ केली होती.त्यामुळे EMI आणि लोन घेणाऱ्यांचे हप्ते वाढणार आहेत. या आर्थिक वर्षात रेपो रेट 6.5 टक्क्यांवर पोहोचेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.बँकाना जेव्हा RBI कर्ज देते तेव्हा त्याला रेपो रेट म्हणतात. रेपो दरात घट झाल्यामुळे कर्जाचा EMI कमी होतो. रेपोदरात वाढ झाल्याने कर्जेदेखील महाग होतात.
Spread the love
Exit mobile version