
मांडवगण हे तालुक्यातील मोठे गाव असून याठिकाणी श्रीगोंदा पोलिस स्टेशनचे तत्कालीन पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली बंद पडलेली पोलिस चौकी चालू करून घेतली होती काही वर्ष ही पोलिस चौकी व्यवस्थित चालली इथे रोज दोन कर्मचारी असायचे सध्या ही पोलिस चौकी बंद पडली असून नागरिक याचा उपयोग कपडे वाळत घालण्यासाठी करत आहे.
तरी सदरील पोलिस चौकी चालू करून याठिकाणी पूर्णवेळ पोलिस कर्मचारी देण्यात यावे तसेच तत्कालीन श्रीगोंदा पोलिस स्टेशनचे निरीक्षण बाजीराव पोवार यांनी मांडवगण येथे नवीन पोलिस चौकी बांधून देण्याचे आश्वासन दिले होते तसेच ग्रामपंचायत मांडवगण यांच्याकडून आपणास पोलिस चौकीसाठी जागा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.तरी मांडवगण आणि परिसरातील नागरिकांच्यासाठी चांगली पोलिस चौकी उभारून देण्यात यावी.
तसेच मांडवगण जिल्हा परिषद शाळेच्या भोवती सर्व अवैध धंद्यांचा विळखा आहे तरी शाळेच्या परिसरातील सर्व अवैध धंदे बंद करून शाळा परिसर अवैध धंदे मुक्त करण्यात यावा अशी आपणास या निवेदनाद्वारे विनंती करण्यात येत आहे.
अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी संभाजी ब्रिगेड प्रदेश उपाध्यक्ष शेतकरी आघाडी संग्राम देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष नानाजी शिंदे,माऊली कन्हेकर उपस्थित होते