
Redmi Note 12 5G । रेडमी (Redmi) ही एक अशी टेक कंपनी आहे जी मार्केटमधील सर्वच स्मार्टफोन कंपन्यांना टक्कर देत असते. शानदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशनमुळे कंपनीच्या स्मार्टफोनला मोठ्या प्रमाणावर मागणी असते. मागणी आणि गरज लक्षात घेता कंपनी सतत आपले स्मार्टफोन लाँच करत असते. कंपनी आता मार्केटमध्ये 5G स्मार्टफोन (Redmi 5G Smartphone) लाँच करू लागली आहे. (Latest Marathi News)
Havaman Andaj । राज्यात 13 ऑगस्टपासून पुन्हा पावसाचा जोर वाढणार? पावसासाठी पोषक वातावरण तयार
कंपनीने काही दिवसांपूर्वी Redmi Note 12 Pro 5G हा स्मार्टफोन लाँच केला होता. अशातच आता कंपनीने Redmi Note 12 Pro 5G या फोनचे नवीन मॉडेल (Redmi Note 12 Pro 5G New Model) लाँच केले आहे. कंपनीचा हा 5G स्मार्टफोन वनप्लसला (OnePlus) टक्कर देऊ शकतो. वापरकर्त्यांसाठी कंपनीने या फोनमध्ये १२ जीबी रॅमसह २५६ जीबी स्टोरेज दिले आहे. जाणून घेऊयात या फोनचे फीचर्स आणि किंमत. (Redmi Note 12 5G Launch in India)
Ved । कौतुकास्पद! रितेश देशमुखच्या ‘वेड’निमित्त स्टार प्रवाह वाहिनीने केली अनोख्या विक्रमाची नोंद
जाणून घ्या Redmi Note 12 Pro 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन
रेडमीच्या नवीन स्मार्टफोनमध्ये वापरकर्त्यांना ६.६७ इंचाचा फुल-एचडी (१०८०x२४०० पिक्सल) डिस्प्ले मिळेल. जो एक AMOLED पॅनल असून कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ३ च्या सुरेक्षेसह येतो. हा स्मार्टफोन ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी १०८० प्रोसेसरवर काम करतो. यात १२ जीबी पर्यंत रॅम आणि २५६ जीबी पर्यंतची स्टोरेज दिले आहे. तसेच हा फोन ५००० mAh बॅटरीसह येतो.
Tomato Price Hike । नारायणगावचे टोमॅटो पुन्हा चर्चेत! किलोला मिळतोय ‘इतका’ भाव
कॅमेरा सेटअप
त्याशिवाय यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप पाहायला मिळेल. याचा पहिला सेन्सर ५० मेगापिक्सल सोनी आयएमएक्स ७६६ लेन्स असून ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड-अँगल सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर दिला आहे. तर फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर देखील तुम्हाला पाहायला मिळेल.
Onion Rate । शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! कांद्याचे भाव क्विंटल मागे 500 ते 700 रुपयांनी वाढले
जाणून घ्या Redmi Note 12 Pro 5G किंमत
किमतीचा विचार केला तर या नव्या स्मार्टफोनची किंमत २८,९९९ रुपये इतकी आहे. यात तुम्हाला १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज मिळेल. तुम्हाला हा फोन कंपनीची वेबसाइट आणि फ्लिपकार्टच्या माध्यमातून खरेदी करता येईल. (Redmi Note 12 5G Price)
Bhimashankar Temple । भीमाशंकरला दर्शनाला जाताय? एकदा ही नियमावली पहाच