
भारतीय स्मार्टफोन बाजारात परवडणाऱ्या किंमतीत जबरदस्त फिचर्स देणारा स्मार्टफोन Realme C71 5G लाँच करण्यात आला आहे. कंपनीने हा फोन कमी बजेटमधील ग्राहकांसाठी खास तयार केला असून, यात 18GB पर्यंत RAM, 6300mAh ची दमदार बॅटरी, AI कॅमेरा आणि मिलिटरी ग्रेड स्ट्रॉंग बॉडीसारखे अनेक जबरदस्त फीचर्स मिळतात.
Realme C71 5G चे दोन व्हेरिएंट्स लाँच करण्यात आले आहेत. यातील 4 GB RAM + 64 GB स्टोरेज असलेला बेस मॉडेल ₹7,699 मध्ये उपलब्ध आहे, तर 6 GB RAM + 128 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ₹8,699 ठेवण्यात आली आहे. खास गोष्ट म्हणजे, 6 GB RAM मॉडेलमध्ये व्हर्च्युअल RAM तंत्रज्ञानामुळे युजर्सना 18 GB पर्यंत RAM चा अनुभव घेता येतो.
Daund Kalakendra Firing Update | दौंड गोळीबार प्रकरणावर अजित पवार यांचं धक्कादायक वक्तव्य!
या फोनची विक्री Realme च्या अधिकृत वेबसाइटसोबतच Flipkart आणि ऑफलाइन रिटेल स्टोअर्सवर सुरू झाली आहे. इंट्रोडक्टरी ऑफरअंतर्गत बँक कार्ड वापरून 700 रुपयांची सूटदेखील मिळवता येते.
फोनमध्ये 6.74-इंचाचा HD+ LCD डिस्प्ले दिला असून तो 90Hz रिफ्रेश रेट आणि 568 निट्स ब्राइटनेससह येतो. परफॉर्मन्ससाठी यामध्ये Unisoc T7250 प्रोसेसर वापरण्यात आला आहे. कॅमेराच्या बाबतीत, फोनमध्ये मागील बाजूस 50MP AI कॅमेरा आणि सेल्फीसाठी 5MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. ड्युअल व्ह्यू व्हिडिओ रेकॉर्डिंग, AI फेस क्लियर, AI इरेजर आणि प्रो मोड यांसारखे अनेक AI फीचर्सही यात समाविष्ट आहेत.