
Ravikant Tupkar । स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी अन्नत्याग आंदोलन तात्पुरते मागे घेतले आहे. राज्य सरकार सोबत झालेल्या सकारात्मक बैठकीनंतर रविकांत तुपकर यांनी आंदोलन मागे घेतले आहे. बुधवारी त्यांनी हे आंदोलन मागे घेतले आहे. कर्जत या ठिकाणी आलेल्या हजारो शेतकऱ्यांच्या साक्षीने त्यांनी महिलांच्या हातून दोन चमचे खिचडी देखील खाल्ली. मात्र अन्यत्या आंदोलनामुळे सध्या रविकांत तुपकर यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. (Ravikant Tupkar Health Updates)
Crime । काय सांगता? तब्बल 1 वर्षं आईच्या मृतदेहासोबत राहत होत्या मुली; घटना वाचून बसेल धक्का
रविकांत तुपकर यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना मुंबईतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रविकांत तुपकर लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते करत आहेत.
Ajit Pawar । मुख्यमंत्री पदाबाबत अजित पवारांनी दिले महत्त्वाचे संकेत
माहितीनुसार, रविकांत तुपकर यांची शुगर लेवल कमी झाली आहे त्याचबरोबर त्यांचा ब्लडप्रेशर देखील कमी झाला आहे. याशिवाय त्यांच्या किडनीवरही परिणाम झाल्याची माहिती मिळत आहे. डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
Adani Group Business । अदानींच्या कंपनीचा मोठा धमाका, दोन दिवसांत केली 21,545 कोटींची कमाई