
Rocky Aur Rani Ki Prem Kahani । सध्या बॉक्स ऑफिसवर ‘मिशन इम्पॉसिबल’, ‘ओपेनहाइमर’ आणि ‘बार्बी’ या चित्रपटांचा बोलबाला आहे. या चित्रपटांनी अल्पावधीतच कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. आता या चित्रपटांच्या शर्यतीत आणखी एका नवीन चित्रपटाची भर पडली आहे. नुकताच करण जोहर (Karan Johar) दिग्दर्शित ‘रॉकी और राणी की प्रेम कहानी’ चित्रपट रिलीज झाला आहे. रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) हे या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. (Latest Marathi News)
ब्रेकिंग न्यूज! अहमदाबादच्या रुग्णालयामध्ये भीषण आग
रिलीजच्या पहिल्या दिवशी या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर (Box Office) समाधानकारक कमाई करता आली. परंतु दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने एकूण १६ कोटी रुपयांची कमाई (Rocky Aur Rani Ki Prem Kahani Earnings) केली आहे. चित्रपटाने पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी ३.५ कोटी रुपये जास्त कमावले आहेत. अशातच आज रविवार असल्याने हा चित्रपट आणखी किती कमाई करतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
‘गली बॉय’नंतर आलिया आणि रणवीर ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना एकत्र दिसली आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चित्रपटाची सोशल मीडियावर खूप चर्चा सुरू होती. अशातच आता या चित्रपटाच्या दोन दिवसाच्या कमाईचा आकडा प्रेक्षकांसमोर आला आहे. चित्रपटाने आतापर्यंत २७.१० कोटी रुपयांची कमाई केली आहे.