Site icon e लोकहित | Marathi News

Ramdev Baba: रामदेव बाबा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला, चर्चाना उधाण

Ramdev Baba meets Chief Minister Eknath Shinde, talks

मुंबई : रामदेवबाबांनी (Ramdev Baba) काल सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतल्यानंतर अनेक चर्चाना सुरु झाल्या. त्यांच्या या भेटीवरून अनेक चर्चा चालू असतानाच आता रामदेवबाबांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर रामदेवबाबांनी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमनं उधळली. त्याचबरोबर रामदेवबाबांनी मुख्यमंत्र्यांना बाळासाहेब ठाकरेंचे मानस आध्यात्मिक आणि राष्ट्रीय उत्तराधिकारीदेखील म्हटल्यामुळे यावरून राजकीय चर्चा होण्याची शक्यता आहे.

Eknath Shinde: पोलीस, अग्नीवर भरतीसाठी तरुणांना आवश्यक सुविधा पुरवा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश

एकीकडे राज्यामध्ये आधीपासूनच शिवसेना नेकमी कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? यावरून अनेक वादविवाद सुरु आहेत. शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातला हा वाद थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहचलाय. त्यामध्येच आता रामदेवबाबा यांनी एकनाथ शिंदेंना बाळासाहेब ठाकरेंचे राष्ट्रीय उत्तराधिकारी म्हटल्यामुळे या वादात जास्त भर पडण्याची शक्यता आहे.

ST Employee: एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता द्या! एकनाथ शिंदेंच्या परिवहन खात्याला सूचना

नेमकं काय म्हणाले रामदेवबाबा?

माध्यमांशी बोलताना रामदेव बाबा म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंदू धर्माचे, सनातन धर्माचे गौरव पुरूष आहेत. आपल्या राजधर्मासोबत ते आपल्या सनातन धर्म आणि ऋषीधर्माचं प्रामाणिकपणे पालन करतायेत. त्यांना आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आलो होतो”, असं रामदेवबाबा म्हणाले आहेत.

Rohit Pawar: रोहित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला, राजकीय चर्चाना उधाण

Spread the love
Exit mobile version