
Ramdas Athawale Accident । सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये रामदास आठवले यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. सुदैवाने रामदास आठवले या अपघातातून सुखरूप बचावले आहेत. आठवले यांच्या गाडीला कंटेनरने धडक दिल्याने हा अपघात झाला आहे.
Congress । राजकारणात खळबळ! काँग्रेला धक्का, मुंबईत फक्त मिळणार इतक्या जागा

साताऱ्यातील वाईजवळ ही अपघाताची घटना घडली असून अपघातानंतर रामदास आठवले दुसऱ्या वाहनाने मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. रामदास आठवले यांच्या वाहनाच्या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
रामदास आठवले यांच्याकडून अद्याप अधिकृतपणे अपघाताबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. मात्र थोड्या वेळात ते त्यांच्या फेसबुक किंवा ट्विटर अकाउंट वरून याबाबत माहिती देतील अशी शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. मात्र ते सुखरूप असल्याचे देखील माहिती मिळत आहे.
Manoj Jarange । मनोज जरांगे पाटलांकडून सर्वात मोठा गौप्यस्फोट